उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये जलव्यवस्थापन जाणीवजागृतीच्या कृतीकार्यक्रमांची परिणामकारता

  • रविंद्र सोना . मंडलिक संषोधक विद्यार्थीए विद्या प्रतिष्ठाण षिक्षणषास्त्र महाविद्यालय, अहमदनगर
  • अविनाष . भांडारकर संषोधक मार्गदर्षकए विद्या प्रतिष्ठाण षिक्षणषास्त्र महाविद्यालय, अहमदनगर
Keywords: जलव्यवस्थापन, जाणीवजागती, कृतीकार्यक्रम, परिणामकारकता.

Abstract

प्रस्तुत संषोधन अभ्यासामध्ये उच्च माध्यमिक विद्यालयातील विद््यार्थ्यांमध्ये जलव्यवस्थापन जाणीवजागृती विकससनासाठी तयार करण्यात आलेल्या कृतीकार्यक्रमांच्या परिणामकारकतेचा अभ्यास करण्यात आला आहे. उद्दिष्टांची निष्चिती करून साध्य करण्यासाठी संषोधकाने विद्यार्थ्यांमध्याल जलव्यवस्थापन जाणीवजागृतीचा सद्यस्थ्तितील शोध घेण्यासाठी स्वनिर्मित 50 गुणांची जलव्यवस्थापन जाणीवजागृती बहुपर्यायी प्रष्नावलीची निर्मिती करून ती तज्ञ मार्गदर्षक, विषय षिक्षक यांच्या मार्गदर्षनाखाली व पथदर्षक अभ्यास करून प्रमाणित केली. अहमदनगर जिल्ह्यातील 5 उच्च माध्यमिक विद्यालयांची निवड करून प्रत्येकी 80 याप्रमाणे 400 मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले. यातील न्यू इंग्लिष स्कूल उच्च माध्यमिक विद्यालय, पारनेर या विद्यालयातील 60 विद्यार्थ्यांची सहेतुक पद्धतीने प्रयोग करण्यासाठी निवड करण्यात आली. परिकल्पनांचे परिक्षण व कृतीकार्यक्रमांच्या परिणामकारकतेचा अभ्यास करण्यासाठी एकल गट अभिकल्प निवडून प्रायोगिक पद्धतीने कृतीकार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यात आली.एकूण 60 विदयार्थ्यांच्या पूर्व व उत्तर चाचणीतील माहितीच्या आधारे संख्याश्षास्त्रीय विष्लेषण केले,यामध्ये एकूण 60 विद्यार्थी, 30 मुले व 30 मुली यांच्या गटांचे मध्यमान,प्रमाण विचलन व 0.05 व 0.01 या सार्थकता स्तरावर टी परिक्षण करण्यात आले. विष्लेषणातून उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये जलव्यवस्थापन जाणीवजागृतीसाठी राबविलेल्या कृतीकार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या जलव्यवस्थापन जाणीवजागृतीमध्ये वाढ झालेली आढळून आली.
Published
2022-12-01